Monday 22 November, 2010

मधुरिमा कुळकर्णी १ - मीही एकदा पडलो प्रेमात


कॉलेजमध्ये असताना मीही एकदा पडलो प्रेमात
काहीतरी जादू होती कुळकर्ण्यांच्या मधुरिमात

मधुरिमा कुळकर्णी ही कॉलेजातली क्वीन होती
सगळी शिष्ट मुलंसुद्धा तिच्यासमोर दीन होती

गोरा होता रंग तिचा, नाजूक ओठांची कमान होती
ऐश्वर्याही तिच्यासमोर मायावतीसमान होती

घारे तिचे डोळे होते, कमनीय बांधा होता
ती पटत नाही हाच तर सगळ्यांचाच वांदा होता

तिला बघायला मुलं रोज न चुकता वर्गात यायची
ती मात्र सर्वांसमोर विनाकारण भाव खायची

एकदा रस्त्याने जाताना तिने मला धडक दिली
माझ्याकडली सगळी पुस्तके एकदमच खाली पडली

‘आय अ‍ॅम सॉरी’ म्हणत, ती पुस्तके उचलू लागली
माझ्या मनात तेव्हा प्रेमफुलं उमलू लागली

त्यानंतर आमची भेट वारंवार होऊ लागली
अफेअरची आशा मनात माझ्या आता जागू लागली

माझ्या मनातील भावना तिच्याही मनी असतील का?
प्रेममेघ तिच्या मनात माझ्यासारखेच बरसतील का?

असे प्रश्न दिवसरात्र मला सारखे छळू लागले
एक कोवळे नाजूक प्रेम माझ्या मनी रुळू लागले

एकदा धीर केला म्हटलं विचारूया आज तिला
जीवनभर साथ देशील का मला माझ्या प्रीतफुला?

रेस्टॉरंटमध्ये गेलो आम्ही बर्गरची ऑर्डर दिली
मी बोलण्याआधीच मात्र तिने बोलायला सुरुवात केली

काल माझं लग्न ठरलं, खूप आनंद झालाय मला
तू मला भावासारखा, म्हणून आधी सांगितलं तुला

मागे रमेशने लग्नासाठी केलं होतं मला प्रपोज
मी होकार दिला होता, घरी जरी झालं अपोज

काल मात्र बाबांनी लग्नाला माझ्या परवानगी दिली
मोठा भाऊ म्हणून मला, तुझीच आठवण आधी आली

रमेश माझ्या दुःखांवर एक रामबाण लोशन आहे
माझ्यासाठी कॉलेजमध्ये तोच हृतिक रोशन आहे

हे ऐकून माझ्या हृदयावर एक मोठा आघात झाला
काय पाहिलं त्या बोकडात असा विचार मनात आला

रमेश कसला हृतिक रोशन, एक नंबरचा पाजी आहे
तरीही ही त्याच्याबरोबर, लग्नासाठी राजी आहे

बोकड, गाढव, रेडा, हत्ती यांचं तो एक मिक्स आहे
तरीही आज त्याच्याबरोबर, हिचं लग्न फिक्स आहे

भाऊ म्हटल्याबद्दल मला मधुरिमाचा राग आला
बिल तिला भरायला लावून मी माफक सूड घेतला

तेव्हा ठरवलं आता कधी पडायचं नाही प्रेमात
एवढं काय ठेवलं आहे कुळकर्ण्यांच्या मधुरिमात

खूप वर्षांनी मधुरिमा मला एकदा बाजारात भेटली
ओळखलंच नाही तिला, मला ती जयललिताच वाटली

नाजूक मधुरिमा आता एक हत्तीण झाली होती
गोबर्‍या गालांच्या जागी आता गालफडं आली होती

गोलगप्पा झाली होती, सार्‍या बाजूंनी उसवली होती
मुलाचा हात धरला होता, मुलगी कडेवर बवसली होती

मागे उभा नवरा बघून मला लगेच साक्षात्कार झाला
नवरा नव्हे हिला तर एक फुकट हमाल मिळाला

उभा होता गपगुमान सगळ्या पिशव्या हातात घेऊन
बघत होता तिच्याकडे सतत दातओठ खाऊन

हतबुद्ध दिसत तो होता, चेहरा त्याचा उतरला होता
हृतिक जाऊन आता फक्त शक्ती कपूर उरला होता

थँक्यू देवा मनात म्हणालो, ही नव्हती माझ्या प्रेमात
काहीसुद्धा उरलं नाही कुळकर्ण्यांच्या मधुरिमात

-- संकेत



टीप: स्वामी संकेतानंदांचा कवितालेखनाचा क्रॅश कोर्स वाचून मला ही कविता लिहिण्याची बुद्धी झाली. त्यामुळे त्यांचे विशेष आभार.

16 comments:

  1. अरेरे... कोल्ह्याला द्राक्षे आंबट असा प्रकार झाला.

    ReplyDelete
  2. सौरभ,
    कोल्हाही खरा नाहीये आणि द्राक्षही खरी नाहीयेत रे. ही कविता सत्यघटनेवर आधारित नाही. :-)

    सचिन,
    धन्यवाद भौ.. :-)

    ReplyDelete
  3. हाहाहा झक्कास भौ..

    >> ही कविता सत्यघटनेवर आधारित नाही.

    असं लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही सत्यघटनेवर आधारित असतेच (and vice versa) असं मी ऐकलं होतं एकदा...... कुळकर्ण्यांच्या मधुरिमाकडूनच :P

    ReplyDelete
  4. >> ही कविता सत्यघटनेवर आधारित नाही.

    असं लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही सत्यघटनेवर आधारित असतेच (and vice versa) असं मी ऐकलं होतं एकदा...... कुळकर्ण्यांच्या मधुरिमाकडूनच :P

    +100

    मस्त जमलीये कविता!!

    एक महत्त्वाचे कुलकर्णी असे न लिहीता कुळकर्णी असे लिहिल्याबद्दल मनापासून आभार!! (माहेरची कुळकर्णी ना मी :) )

    ReplyDelete
  5. हेरंब आणि तन्वीताई,
    आणखी काय काय सांगितलं कुळकर्ण्यांच्या मधुरिमाने तुम्हाला? बरोबर तो पाजी रमेशही होता का? पुढच्या वेळी कधी भेटली ती मधुरिमा तर तिची ख्यालीखुशाली विचारा आणि त्या रमेशला चार शिव्या घाला माझ्यातर्फे.. ;-)

    तन्वीताई,
    तुझी कोणी दूरची चुलतबहीण आहे का मधुरिमा नावाची? ती कदाचित हीच असेल... ;-)

    ReplyDelete
  6. सविताताई आणि प्रॉफेट बाबा,
    मनःपूर्वक धन्यवाद... :-)

    ReplyDelete
  7. अरे काय हे शिष्या?? स्वामीजींपासून पाडाडी शिकलीस, इतके छान "यपाक" पाडलेस आणि स्वामीजींचा साधा नामोल्लेख नाही!!! :O किती ही कृतघ्नता !! मग तू काय रे ती गुरुदक्षिणा देणार??
    खरेच छान पाडलेस हे "यपाक" !! मला आवडले, अगदी विनोदी.. पण हो, तुला मधुरिमा नाही मिळाली म्हणून तिच्या भविष्याचे चुकीचे वर्णन करतोस होय रे? "आबंट द्राक्षे" हे हेहे !!!

    ReplyDelete
  8. स्वामी संकेतानंद,

    झालेल्या चुकीची दुरुस्ती केली गेली आहे. तरीही आपण या अज्ञ बालकावर रोष धरू नये ही आपल्या चरणी विनम्र प्रार्थना... :-P
    आणि हो, मधुरिमाच्या भविष्याचं वर्णन नाही काही; ती भेटली ना मला मार्केटात. त्यामुळे वर्तमानाचं वर्णन आहे ते...

    ReplyDelete
  9. संकेत ,मस्तच झाली आहे रे कविता.... :)

    ReplyDelete
  10. धन्यवाद भौ... आणि हो, ब्लॉगवर हार्दिक स्वागत. :-)

    ReplyDelete
  11. hehe... masta jamliye kavita..fun to read!

    ReplyDelete