Friday, 22 October, 2010

रजनीकांत फॅक्ट्स

आजकाल रजनीकांतची चलती आहे. त्याचा ‘एंदिरन’ (हिंदीतला ‘रोबॉट’) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अनेक मेल्स, ब्लॉग्ज, लेख आणि इतर बर्‍याच ठिकाणी रजनीकांत काय काय करू शकतो याची जोरदार चर्चा चालू आहे. या चर्चेतलीच ही काही रत्नं:
१. रजनीकांतने एकदा एका घोड्याच्या तोंडावर लाथ मारली. त्या घोड्याचे वंशज आजकाल ‘जिराफ’ म्हणून ओळखले जातात.
२. प्रश्न: रजनीकांत काळा चष्मा का घालतो? उत्तर: सूर्याचं आपल्या डोळ्यांपासून रक्षण व्हावं म्हणून!
३. रजनीकांत ‘रिसायकल बिन’ पण डिलिट करू शकतो.
४. रजनीकांतने एकदा एक बाटलीभर झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. त्यामुळे त्याची एक पापणी लवली.
५. पृथ्वी आधी फिरत नव्हती. रजनीकांतने धावताना तिला मागे ढकललं आणि तेव्हापासून आपली पृथ्वी स्वतःभोवती फिरू लागली.
६. जेव्हा रजनीकांत जोर (इंग्रजीमध्ये याला ‘पुशप्स’ म्हणतात) काढत असतो, तेव्हा तो स्वतःला वर उचलत नसतो. तो पृथ्वीला खाली ढकलत असतो.
७. रजनीकांतने अनंतापर्यंत मोजणी केली आहे. आणि तीही दोनवेळा!
८. रजनीकांत जेव्हा पाय हलवतो तेव्हा एक छोटं वादळ तयार होतं. कतरिना चक्रिवादळ रजनीकांतच्या जेवणानंतर केलेल्या शतपावलीमुळे निर्माण झालं होतं.
९. रजनीकांतचं फेसबुकवर ऑर्कुट अकांऊट आहे.
१०. रजनीकांतला Pi (Pi म्हणजे वर्तुळाच्या परीघाचं (Circumference) त्याच्या व्यासाशी (Diameter) असणारं गुणोत्तर (Ratio). Pi मध्ये अनंत अंक आहेत) मधील सगळे अंक ठाऊक आहेत.
११. रजनीकांत एवढ्या वेगात धावू शकतो की, तो पृथ्विप्रदक्षिणा पूर्ण करून स्वतःच्या पाठीवर गुद्दा मारू शकतो.
१२. रजनीकांत जेव्हा जेव्हा आरशात पाहतो तेव्हा तेव्हा आरसा तडकतो, कारण रजनीकांतचं प्रतिबिंब दाखवण्याची आरशाचीही लायकी नाही.
१३. रजनीकांतला जगातल्या सगळ्या भाषा येतात. एवढंच नव्हे, तर तो कुत्र्यांशी कुत्र्यांच्या भाषेत आणि मांजरांशी मांजरांच्या भाषेत बोलू शकतो.
१४. रजनीकांत कॉर्डलेस फोनने तुमचा गळा आवळू शकतो.
१५. रजनीकांत हातावर घड्याळ बांधत नाही, कारण कोणतीही वेळ रजनीकांतच ठरवतो.
१६. रजनीकांतच्या घराला दरवाजे नाहीत, फक्त भिंती आहेत. त्या भिंतींतून तो आरपार जाऊ शकतो.
१७. रजनीकांत शिंकला तेव्हा विश्वाचा जन्म झाला. त्याला आजकाल ‘बिग बँग थिअरी’ म्हटलं जातं.
१८. ‘बर्म्युडा ट्रँगल’ हा आधी त्रिकोण नसून एक चौकोन होता. रजनीकांतने लाथ मारल्यावर त्या चौकोनाचा त्रिकोण झाला.
१९. जेव्हा लिओनार्डो द विंचीने मोनालिसाचं चित्र काढलं होतं तेव्हा मोनालिसाने रजनीकांतकडेच बघून स्मितहास्य केलं होतं.
२०. रजनीकांत बँकेकडून कर्ज घेत नाही; तो बँकेला कर्ज देतो.
२१. आपल्याला भीती वाटल्यावर आपण ‘अरे देवा’ म्हणतो. देवाला भीती वाटल्यावर तो ‘अरे रजनीकांत’ म्हणतो.
२२. बॅटमॅन, सुपरमॅन, स्पायडरमॅन आणि बाकीचे सगळे सुपरहीरो गुरुपौर्णिमेला रजनीकांतला गुरुदक्षिणा देतात.
२३. रजनीकांत आयपॉडवरून लोकांना फोन करू शकतो.
२४. रजनीकांतचा पराभव करणं फक्त आणि फक्त त्याला स्वतःलाच शक्य आहे. त्याने रचलेले विक्रम फक्त तोच मोडू शकतो.
२५. रजनीकांतचा ईमेल आयडी आहे: gmail@rajnikanth.com
२६. रजनीकांत माशाला पाण्यात बुडवून मारू शकतो.
२७. रजनीकांतने लहान असताना कधीच गादी भिजवली नाही. गादीच त्याला घाबरून स्वतः भिजायची.
२८. रजनीकांतने मॅकडोनाल्ड्समध्ये जाऊन इडली मागितली आणि त्या लोकांनी ती बनवून दिली.
२९. रजनीकांत प्रकाशाच्या वेगाने धावत नाही; प्रकाश रजनीकांतच्या वेगाने धावतो.
३०. रजनीकांत चंद्र आणि मंगळावर जाऊन आला आहे. म्हणूनच तिकडे जीवसृष्टी नाही.
३१. रजनीकांत स्वतःच्या केसाने व्हायोलिन वाजवू शकतो. एवढंच नव्हे, तर तो प्रत्येक केसाने एक वेगळं व्हायोलिन एकाच वेळी वाजवू शकतो.
३२. इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे. रजनीकांतला घाबरूनच ते लोक तिकडे गेले आहेत.
३३. ६० मिनिटांचा कार्यक्रम रजनीकांत २० मिनिटांत बघू शकतो.

आणि सगळ्यांत भन्नाट म्हणजे...

३४. रजनीकांतला कापूसकोंड्याची गोष्ट कधी संपते ते माहित आहे!!!!

टीप: अनेक मेल्स, ब्लॉग्ज आणि इतर अनेक लेखांमध्ये पूर्वोल्लिखित (वा! काय शब्द सापडला आहे!) गोष्टींचे उल्लेख आलेले आहेत. त्यामुळे या गोष्टींचा नेमका स्रोत सांगणं कठीण आहे. त्यामुळे इच्छा असूनही त्यांचे संदर्भ देता येत नाहीयेत. ‘कॉपीराईट प्रोटेक्शन’वाल्यांनी उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी.

6 comments:

 1. सॉलिड कलेक्शन आहे...सगळं एका जागी वाचून एकदम लोटपोट झालो आहोत.............आज झोपेत पण ही ही ही हा हा हा....करू बहुतेक.....

  ReplyDelete
 2. थँक्यू थँक्यू... अजूनही बर्‍याच गोष्टी रजनीकांत करू शकतो. पण रजनीदेवांच्या सगळ्या लीला शब्दांकित करण्याची म्या पामराची योग्यता नाही गं. ;)

  ReplyDelete
 3. भरररर्र्र्र्र्र्र्री सगेळे एक सो एक..आवडले :)

  ReplyDelete
 4. धन्यवाद. ब्लॉगवर हार्दिक स्वागत. एक लेटेस्ट: रजनीकांतला चितळ्यांकडे १ ते ४ या वेळात बाकरवडी मिळू शकते... (‘आवरा’ Facebook च्या सौजन्याने)

  ReplyDelete
 5. रजनीदेवाय नमः!

  ReplyDelete
 6. सर्वदेवनमस्कारः रजनीदेवं प्रति गच्छति ।

  ReplyDelete